भास्कर चंदनशीव (१९४४–२०२५) हे मराठवाड्यातील दुष्काळी भागातील प्रमुख ग्रामीण कथाकार आहेत. त्यांच्या कथांमधून शेतकरी जीवन, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, दलित–ग्रामीण जाणिवा आणि मानवी व्यथा यांचे प्रामाणिक चित्रण दिसून येते. प्रस्तुत शोधनिबंधात त्यांच्या जांभळे (१९८०), मरणकळा (१९८३), अंगारमाती (१९९१) आणि नवी वारूळ (१९९२) या प्रमुख कथासंग्रहांच्या आधारे ग्रामीण जीवनाचे चित्रण, सामाजिक वास्तव, भाषिक शैली आणि समकालीन संदर्भ यांचा अभ्यास करण्यात आला आहे. प्राथमिक ग्रंथांसोबत Historicity Research Journal, अभिसरण, इतर जर्नल लेख, थेसिस आणि समीक्षा यांच्या आधारे चंदनशीव यांची कथा मराठी ग्रामीण साहित्यातील महत्त्वपूर्ण सामाजिक दस्तऐवज असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या कथांतून ग्रामीण महाराष्ट्राच्या बदलत्या वास्तवाचा इतिहास, वर्तमान आणि सामाजिक जाणीव एकत्रितपणे जाणवते.
भास्कर चंदनशीव, ग्रामीण साहित्य, शेतकरी जीवन, दुष्काळ, दलित-ग्रामीण जाणिवा, सामाजिक वास्तव.
श्री. शंकर झुंबर वडणे. भास्कर चंदनशीव यांच्या कथांमधील ग्रामीण जीवनाचे चित्रण आणि सामाजिक वास्तव. Indian Journal of Modern Research and Reviews. 2026; 4(10):77-81
Download PDF